जाहिरात

ग्रीन सिटी मोहिमेत १५ हजार वृक्षलागवड व संवर्धनाचे उद्दिष्ट पूर्ण!

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - शहराला (Green City Ahilyanagar) ‘हरित अहिल्यानगर’ म्हणून नवीन ओळख मिळवून देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘ग्रीन सिटी मोहिमेत’ (Tree Plantation Campaign) एक उल्लेखनीय टप्पा पार पडला आहे.

या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५ हजार वृक्षलागवड व संवर्धनाचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. या निमित्ताने साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विशेष वृक्षवाटप उपक्रम राबविण्यात आला.

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या लोकचळवळीचे आमदार योगेश टिळेकर यांनी विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना आमदार टिळेकर म्हणाले की, समाजाचे आपल्यावर ऋण असून, पुढील पिढीसाठी संपत्तीपेक्षा वृक्षांची सावली आणि जलसंधारण (Water Conservation) अधिक महत्त्वाचे आहे.

आज होत असलेल्या अनिर्बंध वृक्षतोडीमुळे काँक्रीटची जंगले उभी राहत असताना, या मोहिमेच्या माध्यमातून वर्षभरात एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हरितक्रांतीचे (Green Revolution) काम सुरू असून युवकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

नगरसेवक निखिल वारे यांनी मनोगतात सांगितले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी (Environmental Balance) आणि आगामी काळातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.

या कार्यक्रमास आमदार योगेश टिळेकर, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्यासह भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक निखिल वारे, बाबासाहेब सानप, रोहन सानप, अभिजीत बोरुडे, ॲड. सुधीर पोटे, गणेश विद्ये, अमोल बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांनी कमी पाण्यावर जगणाऱ्या आणि वाढणाऱ्या देशी वृक्षांच्या (Indigenous Trees) लागवडीवर भर द्यावा. वृक्ष लावण्यासोबतच त्याचे संगोपन करणे ही आपली सामूहिक नैतिक जबाबदारी आहे.

या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे (Eco-friendly Initiative) अहिल्यानगर शहर खऱ्या अर्थाने हरित शहर म्हणून नावारुपास येत आहे.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !