सच परेशान हो सकता है, पराजित नही ...!
पत्रकारिता ही एक समाज बांधिलकी आहे. मात्र काही महाभाग तिचा दुरुपयोग करून आपले खिसे भरण्याचे काम करतात तेंव्हा पत्रकाराचा "पत्रककार" होतो. आटपाट नगरात असाच एक महाभाग कुंभमेळ्याच्या पावन भूमीत आपली तुंबडी भरण्यासाठी 'सकाळ' च्या प्रहरिच स्वतःला वेळोवेळी विकत असे. बर ज्याचा पगार घेतो त्या संस्थेची 'मान' मर्यादा देखील वाम मार्गाने 'श्रीमंत' होण्याच्या मागे लागलेल्या या भ्रष्टाणे वेशीवर टांगली.
ई-माने इतबारे जबाबदारी पार पाडायची सोडून रामाच्या भूमीत हा दिवट्या चिरीमिरी साठी आपल्या अकलेचे दिवे पाजळायचा. आपल्या भविष्याचा उदय व्हावा म्हणून काही सवंगडी बरोबर घेऊन याचा नंगा नाच सुरूच होता. याच वेळी लोकसभेचे बिगुल वाजले असताना एका सच्च्या पत्रकाराच्या रुपाने 'सकाळ' झाली नि अंधकारात लोटत चाललेल्या पत्रकारितेला एक नवी 'उमे'द मिळाली.
'सच परेशान हो सकता है, पराजित नाही' हे उमेदिचे ब्रीद. मग काय या उमेदिपुढे दिवट्या श्वापदाचे दिवे फडफडायला लागले. वाईटा (दिवट्या) वीरिद्ध चांगल्या (उमेद) ची लढाई सुरू झाली. खोट्या विरुद्ध खऱ्याच्या या लढाईत सच्चाईची 'उमेद' या 'दिवट्या'ला चांगलीच पुरून उरली.
लवकर श्रीमंत होण्यासाठी या भा-ब-ड्याने बायकोलाही मैदानात उतरवले. "जीवन के साथ भी, जीवन के बाद भी" म्हणत तिने 'उमेदी'चा पाठलाग सुरू केला. (अनेक कर्मचाऱ्यांचा असाच पाठलाग झाला. काही धारातीर्थी पडले तर काही कसेबसे निसटले. मात्र त्रास सगळ्यांनाच दिला या बयेने.) मात्र 'खंडणी' मागण्याची ही 'पॉलिसी' मोठ्या उमेदीने चिरडून टाकली. प्रकरण 'सकाळी'च 'धन्या'पर्यंत पोहचले. दिवट्याचे सर्व 'प्रताप' उघडे पडले.
बराईकी 'अभि' 'जीत' नामुनकीन थी. उमेदीने दिवट्याची 'मान' चांगलीच मुरगाळली. त्याच्या अभद्र 'श्रीमंती'ची कौटूंबिक लक्तरे 'सकाळी'च 'चौका'च्या वेशीवर टांगली गेली. उमेदिला छेडायचे नाही, असे आदेशच दिवट्याला दिले गेले. आपल्या धन्याची लाचारी पाहून त्याचे हस्तकही पुरते हैराण झाले.
दिवट्या मान खाली घालून उमेदीला सलाम ठोकायचा. दिवट्याने छळलेले सर्वच जण या घटनेमुळे आनंदित, हर्षउल्हासित झाले. पराभवाने पेटलेला दिवट्या अधूनमधून खोड्या काढायचा पण उमेदिकडून त्याची नांगी ठेचली जायची. मग तो पुन्हा विव्हळत कुईकुई करायचा. असे अनेक फटके खाल्यावर दिवट्याला शेवटचा जोरदार निर्णायक फटका बसला आणि तो चितपट झाला.
स्वतःची जहागिरी समजत असलेल्या किल्यातच दिवट्याच्या अब्रूची लक्तरे छिन्नवीछिन्न केली गेली. शेवटी सगळे अधिकार काढून राजाने त्याच्या पृष्ठभागावर लाथ मारून हाकलून देण्याचा 'अभिजित' 'प्रताप' केला. दिवट्या ला आता पुण्यभूमीत खेटराने मारतील अशी परिस्थिती आहे.
या घटनेतून वाईटाशी 'उमेदी'ने लढल्यास खोट्या 'श्रीमंती'चा 'मान' नि माज उतरतोच, तसेच
वाईटाचा शेवट होतोच हीच शिकवण मिळते.
(नुकत्याच झालेल्या कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. बाकी खाज असल्यास आमची काही हरकत नाही. ती पुन्हा एकदा उतरवली जाईल, याची शास्वती बाळगावी)
क्रमश:
(टीप - उर्वरित भाग लवकरच)