सराईत गुन्हेगारांच्या घरावर पोलिसांचे छापे
नाशिक : शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी कारवाईचा बडगा उचलत पहाटेच्या सुमारास थेट सराईत गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकले आहेत. यामुळे गुन्हेगारांच्या विरोधात पोलीस आयुक्त ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारांनी डोकेवर काढल्याचे दिसते. जुने नाशिक, द्वारका परिसरात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या टोळी युद्धात एकाच मुलाचा खून झाला होता. पंचवटीमध्ये देखील गुन्हेगार फॉर्मात आल्याचे दिसतेय. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत अवस्थेत वावरत आहे.
त्या पार्शवभूमीवर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज होती. पोलीस आयुक्त पांडे यांनी पोलीस पथकासह पहाटे पहाटेच गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकले. या कारवाईत 6 गुन्हेगारांच्या मूसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गावठी कट्टयासह 20 प्राणघातक शस्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत बसेल अशी अशा आहे.
आता पुढेही कारवाई सुरूच राहील असे दिसतेय. कारण, अजूनही अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजतेय. त्यामुळे आता गुन्हेगार थंड होतील असे दिसतेय.