अहमदनगर - जिल्ह्यात रविवारी एका दिवसात कोविड बाधित रूग्णसंख्येत 1,573 ने वाढ झाली आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १० हजार २४६ इतकी झाली आहे.
रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 566 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 616 आणि अँटीजेन चाचणीत 391 रुग्ण बाधीत आढळले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी 510 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 55 हजार 947 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.34 टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 152, अकाले 71, जामखेड 19, कर्जत 31, नगर ग्रा. 31, नेवासा 22, पारनेर 29, पाथर्डी 32, राहता 4, राहुरी 17, संगमनेर 4, शेवगांव 26, श्रीगोंदा 48, श्रीरामपूर 2, कॅन्टोनमेंट बोर्ड 56, मिलिटरी हॉस्पिटल 19 आणि इतर जिल्हा 3 रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 246, अकोले 23, जामखेड 4, कर्जत 6, कोपरगाव 21, नगर ग्रा. 46, नेवासा 19, पारनेर 31, पाथर्डी 11, राहाता 99, राहुरी 15, संगमनेर 6, शेवगाव 4, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 16, कॅन्टोन्मेंट बोर्ड 11 आणि इतर जिल्हा 40 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 391 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 111, अकोले 23, जामखेड 10, कर्जत 3, कोपरगाव 21, नगर ग्रा. 22, नेवासा 9, पारनेर 5, पाथर्डी 49, राहाता 69, राहुरी 15, संगमनेर 6, शेवगांव 4, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 16, कॅन्टोन्मेंट बोर्ड 5, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 192, अकोले 22, जामखेड 8, कर्जत 8, कोपरगाव 19, नगर ग्रा 31, नेवासा 5, पारनेर 12, पाथर्डी 17, राहाता 63, राहुरी 19, संगमनेर 7, शेवगांव 20, श्रीगोंदा 9, श्रीरामपूर 32, कॅन्टोनमेंट बोर्ड 16, मिलिटरी हॉस्पिटल 26, इतर जिल्हा 12 आणि इतर राज्य 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.