मनोरंजन - 'नेम' असा धरायचा की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे, 'गेम' कोणाचा होणार, या टॅगलाईनने आणि नुकत्याच आलेल्या चित्तथरारक ट्रेलरमुळे निर्माण झालेली उत्सुकता आज संपली आहे. कारण आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर एम. के. स्टुडिओ निर्मित 'माईंड गेम' ही मराठी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
आजपासून युट्युबवर ही वेबसिरीज प्रेक्षकांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहे. एम के स्टुडिओची निर्मिती असलेल्या 'वेब सिरीज'ना यापूर्वीही प्रेक्षकांनी अफाट प्रतिसाद दिलेला आहे. आता 'माईंड गेम' ही मराठीतील एक नवी कोरी 'वेब सिरीज' दाखल झाली आहे.
'नेम' असा धरायचा की शेवटपर्यंत कळलं नाही पाहिजे 'गेम' कोणाचा होणार.. या 'टॅगलाईन'ने 'माईंड गेम' या वेब सिरीजचे पहिले मोशन पोस्टर काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाले. तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली होती.
हा ट्रेलर पाहिलात का ? - रक्तरंंजित थरारपट असलेल्या मराठी वेबसिरीजचे पार्श्वसंगीत प्रचंड उत्सुकता निर्माण करणारे आहे. त्यामुळे अल्पावधीतच या ट्रेलरला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. युट्युबवर प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला अनेेकांनी वाहवा केली आहे.
मंगेश महादेव बदर हे या वेब सिरीजचे दिग्दर्शक आहेत. तर मच्छिंद्र धुमाळ निर्माता आहेत. यामध्ये रोहिदास मिसाळ, योगिता सूर्यवंशी-नळे, सोनाली गायकवाड, मंगेश बदर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रहेमान पठाण व गणेश निमगिरे हे सहकलाकार आहेत.
या वेब सिरीजचे एडिटिंग विशाल सरोदे यांनी केले आहे. तर रोहिणी फडतरे यांनी मेकअपची जबाबदारी पाहिली आहे. रुशिकेश मिंडे, आदित्य माने, महेश नाईक, चैतन्य साळुंके, साई माने, राजु चांदगुडे, आदींनी तांत्रिक बाजू मोठ्या ताकदीने सांभाळल्या आहेत.
मराठीतील आघाडीचे न्यूज पोर्टल www.mbplive24.com आणि 'MBP Live24' हे यु ट्युब चॅनल या वेबसिरीजचे मिडिया पार्टनर आहे. या पोर्टलवर आणि MBP Live24 या 'यु ट्युब चॅनल'वर आपल्याला या वेब सिरीजचे प्रत्येक ताजे अपडेट मिळत राहणार आहेत.
अत्यंत उत्कंठावर्धक 'क्राईम थ्रिलर' असलेली ही वेब सिरीज आजपासून यु ट्युबवर दिसत आहे. एकूण दहा एपिसोड असलेल्या या वेबसिरीजचे पाच भाग आज यु ट्युबवर प्रदर्शित झाले आहेत. ही वेबसिरीज नक्की पहा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा, असे आवाहन 'एम. के. स्टुडिओ' आणि MBP Live24 ने केले आहे.