भरारी ! ‘अविष्कार’ स्पर्धेत 'बाणेश्वर'चेे १३ विद्यार्थी झोनल स्तरावर

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - श्री बाणेश्वर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अहिल्यानगर येथे 'अविष्कार' संशोधन कार्यशाळा (Research Workshop), संशोधन स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

(छायाचित्र : काल्पनिक)

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळून त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना एक उत्तम व्यासपीठ (Platform) मिळाले आहे. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाची संकल्पना (Research Concept), विषय निवड, संशोधन प्रक्रिया आणि प्रभावी सादरीकरण (presentation) याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. डॉ. सोनवणे मॅडम यांनी उत्कृष्ट नियोजन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'अविष्कार' संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ६ विविध श्रेणींमध्ये (Categories) एकूण २६ संशोधन प्रकल्प सादर केले.

या प्रकल्पांचे निष्पक्ष परीक्षण डॉ. मुळे बी. एम., डॉ. शेख आर. एच., डॉ. वाघ मॅडम आणि डॉ. दिवटे मॅडम यांनी पार पाडले. उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची झोनल (विभागीय) स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. श्री बाणेश्वर संस्थेचे अध्यक्ष तथा  आमदार अक्षय कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

प्राचार्य, परीक्षक व प्राध्यापक वृंदाने विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !