करा काम जरा हटके, होतील कमी कुत्रे भटके : 'जाणीव फाऊंडेशन'


अहिल्यानगर - शहरात सध्या भटक्या कुत्र्यांची (Stray Dogs) दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना (Effective Measures) करावी, या मागणीसाठी 'जाणीव फाऊंडेशन'ने महानगरपालिकेचे (Municipal Corporation) आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन (Memorandum) दिले.


हे निवेदन मोहटादेवी ट्रस्टचे विश्वस्त तथा नोटरी पब्लिक (Notary Public) ॲड. विक्रम वाडेकर, बांधकाम व्यावसायिक प्रदीप वाखुरे, प्रा. हर्षल आगळे, उद्योजक विकास गायकवाड, राहुल जोशी, ॲड. व इंजिनीअर कैलाश दिघे यांच्या हस्ते आयुक्तांना सुपूर्द करण्यात आले.

लहान मुले, महिला अन् ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण - शहरातील गल्लीबोळांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने लहान मुले, महिला आणि जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांत कुत्रे चावण्याच्या (Dog Bite Cases) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

या भीतीपोटी विशेषतः लहान मुले व वृद्धांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाने यावर त्वरित कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी फाऊंडेशनने केली आहे.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे संकेत - आयुक्तांचे आवाहन. निवेदन स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरातील परिस्थितीवर भाष्य करताना नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.

हॉटेल चालक, खानावळी, फूड स्टॉल (Food Stalls), मॉल्स तसेच चिकन-मटण विक्रेत्यांनी उरलेले अन्न व मांसाचा कचरा रस्ते किंवा नाल्यांच्या कडेला उघड्यावर टाकू नये. हा कचरा थेट मनपाच्या घंटागाडीतच (Garbage Collection Van) टाकावा.

उघड्यावरील कचऱ्यामुळेच कुत्र्यांचा वावर आणि आक्रमकता वाढते, असे स्पष्ट करत आयुक्तांनी भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी फक्त महापालिकेची यंत्रणा पुरेशी नसून सजग नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी (NGOs) पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले.
 
महापालिकेकडून या समस्येवर लवकरात लवकर ठोस पावले उचलली जातील आणि शहरवासीयांना भयमुक्त वातावरण मिळेल, अशी अपेक्षा 'जाणीव फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !