अहिल्यानगर (Ahilyanagar) - जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर (Illegal Businesses) पोलीस प्रशासनाने (Police Administration) अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
पोलीस अधीक्षक (DSP) यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने नेवासा आणि श्रीगोंदा तालुक्यात मोठी कारवाई (Operation) केली आहे.
पोलीस पथकाने ४ अवैध बिंगो जुगार अड्ड्यांवर धाडी (Raids) टाकून एकूण १,२८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Confiscated Material) केला आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) हरिश भोये आणि पोलीस अंमलदारांचे दोन विशेष पथक तयार करून त्यांना नेवासा व श्रीगोंदा परिसरात जुगार अड्ड्यांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी या पथकाने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे धडक सत्र राबवले. त्यांनी चार ठिकाणांवर छापे (Raids) टाकले.
१. नेवासा पोलीस ठाणे-
जप्त मुद्देमाल: १८,१००/- रुपये.
आरोपी: विवेक पोपट पुंड (वय २६, रा. तरवडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर).
२. श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्द-
जप्त मुद्देमाल: ३७,१५०/- रुपये.
आरोपी: शुभम अरविंद दिक्षीत (वय २८, रा. अवधुतनगर, श्रीगोंदा).
३. श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्द-
जप्त मुद्देमाल: २७,५५०/- रुपये.
आरोपी: ऋषीकेश निंबराज हेंद्रे (वय २७, रा. कुंभारगल्ली, श्रीगोंदा).
४. श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्द:
जप्त मुद्देमाल: ४५,३००/- रुपये.
आरोपी: योगेश अनिल घोडके (वय ३२, रा. सिध्दार्थनगर, श्रीगोंदा).
एलसीबीचे अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अरूण गांगुर्डे, अशोक लिपणे, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, रोहित मिसाळ व प्रताप देवकाते यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे इतर जुगार चालकांचे धाबे दणाणले आहे.

