नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त व लोकप्रिय लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली
नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला होता. त्या सन १९७२ च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक देखील होत्या. त्यांनी सुमारे दीडशे कविता लिहिलेल्या आहेत.
तसेच त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन देखील केलेले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला होता. त्याचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.