सन २०१४मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं होतं. त्यावेळी रंगलेल्या सत्तानाट्यावर भाष्य करताना सहा वर्षानंतर पवारांनी ही कबुली दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या शेवटच्या आणि अंतिम भागात पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. २०१४मध्ये पवारांनी कोणकोणत्या राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला, याचा खुलासाही त्यांनी केला.
तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाची त्यांच्या खास शैलीत खिल्लीही उडवली. फडणवीस जे म्हणाले ते माझ्याही वाचनात आलं आहे. पण गंमत अशी आहे की त्यावेळी ते कुठे होते माहीत नाही? भाजपच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचं काय स्थान होतं हे सुद्धा मला माहीत नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना हे माहीत झाले. असे पवार म्हणाले.