मुंबई - राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा ‘उमेद’ अभियान पुढे आले आहे. गावागावातील माळरानावर राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांची जीवनोन्नती साधण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
यासाठी राज्यात प्रथमच महिला शेतकऱ्यांकरिता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सुमारे साडेचौदा लाख महिला शेतकरी या ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतील. खरीप हंगामातील सेंद्रीय शेती, एकत्रित शेती अशा विविध विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षणामध्ये चर्चा होणार आहे. उद्या शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून हे प्रशिक्षण सुरु होईल.