गणपती बाप्पा कधी कुणाला
वाटलेही नसेल....
कि दोन हजार वीस हे वर्ष
असं महामारीचे असेल.....!!१!!
धुमधडाक्यात व्हायचं हो
तुमचं स्वागत घरोघरी....
स्वागत तुमचं करण्या ढोलताशा
नसतील हो यावर्षी तरी....!!२!!
आपल्या जीवाभावांच्या माणसांना
शेवटचा निरोपही निटनेटका देता येईना.....
असं काय चाललयं रे बाप्पा या जगात
काहीच कुणाला कळेना....!!३!!
विसर्जनासोबत घेऊन जा
बाप्पा तुम्ही ही महामारी....
आणि २०२१ मधे सुख-सम्रुद्धी
आनंद घेऊन याल ना बाप्पा
तुम्ही प्रत्येकाच्या घरी....!!४!!
- शब्दांकन : आशा पाटील (अहमदनगर)