सायंकाळी ७ ते पहाटे ५ - सार्वजनिक वावरावर निर्बंध
अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या फिरण्यावर सायंकाळी ७ ते सकाळी ५ या कालावधीत निर्बंध राहील. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई आहे. सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी कारणाशिवाय येण्यास मनाई आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्सम ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्यादीसाठी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई राहील. सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील.
यांना असेल मुभा
जी अत्यावश्यक दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली होती ती सर्व दुकाने तशीच सुरु राहतील. शारिरीक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाययोजना करुन प्रती बस, कमाल मर्यादा ५० टक्के क्षमतेसह जिल्ह्यांतर्गत बस सेवा चालविण्यास परवानगी असेल. आंतरजिल्हा वाहतुकीचे, नियमितपणे विनियमन (ई-पास व्दारे) करण्यात येईल. सर्व बिगर-अत्यावश्यक बाजारपेठा / दुकाने सकाळी ९ ते सायं.५ वाजेपर्यंत खुली राहतील.