शाब्बास ! भारदे हायस्कूलच्या मुलींच्या संघाचे खो-खो स्पर्धेत उल्लेखनीय यश


शेवगाव (अहिल्यानगर) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (District Sport Office) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय खो-खो स्पर्धा (Kho Kho) वाडिया पार्क, शेवगाव (Shevgaon) येथे दि. १७ रोजी उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव येथील मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या संघाने यापूर्वी जिल्हास्तरावर (District Level) प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.

संघाच्या यशात मार्गदर्शक शिक्षक सचिन शिरसाठ व दीपक कुसळकर यांचे मोलाचे योगदान असून, त्यांचा तसेच विजयी खेळाडूंचा हरीश भारदे व प्रा. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संघाची कर्णधार ज्ञानदा भाडाईत हिच्या नेतृत्वाखाली स्वरा नाईकवाडी, वैष्णवी मारकड, श्रावणी शिरसाठ, काव्या राठोड, आराध्या राठोड, कार्तिकी नगरकर, कामिनी साखरे, राजनंदिनी पन्हाळे, कल्याणी बुलबुल, सौम्या दौंड, आरोही ढाकणे, गौरी खेडकर, ईश्वरी कोटुंबे आणि आरुषी नाईक या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या खेळाडूंनी शाळेचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकवर्ग यांनी खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातही राज्यस्तरावर (State Level) यश संपादन करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !