अहिल्यानगर - कर्जत (Karjat) तालुक्यातील कौडाणे येथील विकास संजय गांगर्डे (Vikas Gangarde) यांची तलाठी सरळसेवा भरतीमधून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदी निवड झाली आहे. सन २०२३ मधील परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून त्यांना १३ मार्च रोजी नियुक्ती आदेश प्राप्त झाला आहे.
विकास गांगर्डे यांनी अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉलेजमधून (New Atrs College) बी.एससी. (BSC) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या यशामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. सन २०१८ मध्ये त्यांच्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.
त्यानंतर त्यांच्या आई नंदा संजय गांगर्डे यांनी शेतमजुरी करून मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा थोड्या गुणांनी संधी हुकली, मात्र विकास यांनी खचून गेले नाहीत.
त्यांनी सातत्याने अभ्यास (Study) सुरू ठेवला. आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळत तलाठी पदावर त्यांची निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शरद जाधव, तुषार वांढेकर, सागर कुरकुटे, सचिन नांदे, राहुल बेल्हेकर, अशोक राजपुरे, सागर नागरगोजे, सचिन कुर्हे, प्रथमेश गायके, सोमनाथ जाधव, विवेक बेल्हेकर आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
