बाणेश्वर महाविद्यालयात घुमला 'वंदे मातरम्'चा स्वर!

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - वंदे मातरम् (Vande Mataram) या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune Univercity) वतीने आयोजित करण्यात आलेला ‘वंदे मातरम् रथ’ शुक्रवारी (दि. १३ मार्च २०२६) सकाळी १० वाजता श्री बाणेश्वर महाविद्यालयात (Baneshwar College) दाखल झाला. यानिमित्ताने महाविद्यालयात देशभक्तीचा जागर करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. स्वाती वाघ यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी वंदे मातरम् गीताचा इतिहास (History) आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचे महत्त्व विशद केले. या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक प्रा. गणेश हरिभाऊ निमसे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव, डॉ. मुळे, डॉ. शेख आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. कोहक यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन व स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एकत्रितपणे सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीत गायन केले, ज्यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता.

कार्यक्रमात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जीवनकार्यावर आणि स्वातंत्र्य चळवळीतील या गीताच्या महत्त्वावर आधारित एक विशेष चित्रफीत (Documentary) दाखवण्यात आली. या उपक्रमामुळे नव्या पिढीला राष्ट्रीय गीताचा ऐतिहासिक वारसा समजण्यास मदत झाली. कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !