श्री बाणेश्वर महाविद्यालयात एड्स नियंत्रण जनजागृती उपक्रम उत्साहात

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर : श्री बाणेश्वर महाविद्यालय, (Baneshwar College) सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स जनजागृती (HIV Aids Awearness) अभियानाचे आयोजन करण्यात आले. 

विद्यार्थ्यांमधील गैरसमज दूर करून प्रतिबंधात्मक उपायांची शास्त्रीय माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. बाणेश्वर संस्थेचे अध्यक्ष तथा युवा नेते आमदार अक्षय दादा कर्डिले (MLA Akshay Kardile) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या समुपदेशक शर्मिला सुरेश कदम यांनी एचआयव्ही/एड्सविषयी वस्तुनिष्ठ माहिती देत बाधित व्यक्तींशी भेदभाव न करता सहानुभूतीने वागण्याचे आवाहन केले. जनजागृतीसाठी क्विझ स्पर्धा (Quiz Competition) व सायकल रॅलीचे (Cycle Rally) महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी समाजात योग्य माहिती पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत प्राचार्य व्ही. एम. जाधव यांनी आरोग्यविषयक विषयांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. जनजागृती ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याचे सांगत मानवतेचा दृष्टिकोन ठेवण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी आयक्यूएसी (IQAC) समन्वयक प्रा. डॉ. शेख आर. एच. व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुळे बी. एम. उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. वाघ एस. यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. माधुरी तिवारी यांनी केले.

महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एड्स जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. महाविद्यालय प्रशासनाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !