'या' शहराच्या विकासाचा खरा वाली कोण?


अहिल्यानगर शहराच्या विकासाचा आणि येथील मूलभूत सुविधांचा (Basic Needs) प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेच्या आणि मतदारांच्या मनातील भावना समजून घेणे, नगरसेवक (Corporaters), महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी गरजेचे ठरले आहे.


शहरातील अनेक रस्त्यांवर असलेले जीवघेणे खड्डे आणि अर्धवट राहिलेली विकासकामे (Development) नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. रस्ते दुरुस्ती करताना केवळ दिखावा न करता, सिमेंटचे (Ciment) दर्जेदार काम होणे आवश्यक आहे.

दुरुस्ती केलेल्या पॅचेसवर पुढील काही दिवस नियमित पाणी मारल्यास कामाचा दर्जा टिकून राहण्यास मदत होईल. शहराला खऱ्या अर्थाने अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने केवळ दिखाव्यापुरती कारवाई न करता, नागरिकांच्या सहभागातून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अंतर्गत रस्त्यांवर (Inside Roads) आणि कॉलनीमध्ये (Colonies) वाहनांच्या पार्किंगमुळे होणारी कोंडी सोडवण्यासाठी रहिवाशांच्या साक्षीने लेखी हमीपत्र घेत कडक पावले उचलली पाहिजेत.

फेज दोन पाईपलाईन (Phase two), गॅस पाईपलाईन (Gas Pipeline), पिण्याच्या पाण्याचे आणि ड्रेनेजचे लाईन्स लिकेजचे प्रश्न तातडीने तपासावे लागतात. प्रशासनातील अधिकारी, उच्चशिक्षित अभियंते आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्पर समन्वयाने काम केल्यास जनतेच्या घामाचा पैसा वाया जाणार नाही. आणि खऱ्या अर्थाने दर्जेदार कामे उभी राहतील.

प्रादेशिक विकास आणि दळणवळण : संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, शिर्डी आणि कोपरगाव या तालुक्यांच्या विकासाच्या तुलनेत जिल्हा मुख्यालय असलेल्या अहिल्यानगरचा वेग वाढवणे गरजेचे आहे.

जिल्हा विभाजन आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी : १९८२ पासून प्रलंबित असलेला जिल्हा विभाजनाचा प्रश्न आणि नगर-पुणे-हिंजवडी आयटी पार्कपर्यंत विशेष डबल रेल्वे लाईन तसेच परवडणाऱ्या दरात सुपरफास्ट लोकल रेल्वे सुरू करणे.

सिटी बस सेवा : तारकपूर बस स्थानक मार्गे शहराच्या मध्यवर्ती भागातून सोळा ते अठरा तास चालणारी स्वस्त आणि वेगवान सिटी बस सेवा सुरू केल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक आणि अभ्यासकांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आत्मपरीक्षण करावे आणि हसतमुखाने सत्य स्वीकारून प्राथमिक डागडुजीनंतर दर्जेदार विकासकामांना प्राथमिकता द्यावी.

- संजय बारस्कर, अहिल्यानगर

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !