अहिल्यानगर - मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. ‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ (Blossoming Almond) या मराठी चित्रपटाची निवड युनायटेड स्टेटसमध्ये (United States) होणाऱ्या पाचव्या ईजिप्शियन अमेरिकन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Egyptian American Film Festival) अधिकृतपणे झाली आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नेहाल एस. घोडके (Nehal S Ghodake) यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले आहेत.
नुकतेच ऑगस्ट महिन्यात दक्षिण कोरियात झालेल्या अकराव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ब्लॉसमिंग ऑलमंड' या सिनेमासाठी नेहाल घोडके यांना 'बेस्ट रायटर' (Best Writer) हा मानाचा पुरस्कार (Award) मिळालेला आहे.
नेहाल घोडके यांनी लिहिलेल्या कथा, पटकथा आणि संवादांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान संपूर्ण टीमसाठी विशेष गौरवाचा क्षण होता. हा चित्रपट पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हा टप्पा त्यांच्या चित्रपट प्रवासातील महत्त्वाचा आणखी एक मैलाचा दगड ठरत आहे. मानवी नात्यांमधील भावभावनांचे पदर उलगडणाऱ्या या सिनेमाला आता अमेरिकेत कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चित्रपटाची प्रमुख टीम –
लेखन व दिग्दर्शन – नेहाल एस. घोडके
पटकथा सल्लागार – अनंत काळे
छायाचित्रण – सचिन गायगोवे
संपादन – अमोल सुरुणकर
कलाकार – मनीषा मोरे, पुरुषोत्तम उपाध्याय, गरजे एन. के., जानवी लाटके, अंजली कोंडावर, रावसाहेब अलकुटे, प्रणित मेढे
अन्य सहकारी –
सहदिग्दर्शक – अमोल सुरुणकर
छायाचित्रण संचालक – सचिन गायगोवे
सहाय्यक – मयुर आहेर, शुभम कराळे, रिजवान सय्यद
लाईटिंग – सचिन गायगोवे, दिनेश सुतार, रिजवान सय्यद
वेशभूषा व मेकअप – श्रेया गायकवाड, अपूर्वा काकडे, सोनिया लोटके
ध्वनी – शुभम एम. कराळे, दिनेश सुतार
कास्टिंग टीम – निवृत्ती गरजे, पुरुषोत्तम उपाध्याय
कार्यकारी निर्माते – अमोल के. सुरुणकर, नेहाल एस. घोडके
मीडिया पार्टनर - MBP Live24

