अहिल्यानगर - सडे (ता. राहुरी) येथील प्रगतशील शेतकरी रामभाऊ मारुती लहारे यांच्या पत्नी भिमाबाई रामभाऊ लहारे यांचे गुरुवार दि. २ ऑक्टोबर, २०२५ रोजी पहाटे १ वाजता वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
त्यांंच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगा, सून, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ॲकॅडेमिक विभागाचे कार्यालयीन अधीक्षक दिलीप रामभाऊ लहारे यांच्या त्या मातोश्री होत्या. कष्टाळू गृहिणी आणि मनमिळावू स्वभाव असा त्यांचा लौकिक होता.
प्रतिकूल परिस्थितीतही गरिबीत असलेला प्रपंच भरभराटीस आणण्यासाठी त्यांनी आपल्या पतीच्या तोडीसतोड काबाडकष्ट केले. मुलाला व मुलींना उत्तम संस्कारांंची शिदोरी दिली. सर्व नातेवाईकांमध्ये 'सड्याच्या बाई' म्हणून त्या अतिप्रिय होत्या.
एक सुस्वभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे, नातेवाईकांमध्ये, आप्तेष्टांंध्ये आणि सडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता, अमरधाम, सडे येथे होणार आहे.
याप्रसंगी ह.भ.प. भाऊसाहेब खळेकर (सर) महाराज यांचे प्रवचन होईल. तसेच तेराव्याचा विधी मंगळवार दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सडे येथे राहत्या घरी होईल.