अहमदनगर - शहरात भर दिवसा काही दहशतवादी घुसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे अहमदनगर पोलिस दलाने काही क्षणातच घटनास्थळी धाव घेतली. सशस्त्र जवान संशयित दहशतवाद्यांच्या मागे पळाले देखील. पण..
झाले असे की ज्यांच्यामागे पोलिस धावले आणि ज्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले, ते दहशतवादी नव्हते. तर हा सर्व प्रकार म्हणजे पोलिस दलाच्या नेहमीच्या सरावाचा एक भाग असल्याचे समोर आले. अन तोवर जीव मुठीत धरून हा प्रकार पहात असलेल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
दरवर्षी पोलिस दलाकडून असा सराव केला जातो. याला 'मॉक ड्रिल' म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये पोलिसांना अमुक एका ठिकाणी दहशतवादी आले असल्याची माहिती मिळाली जाते. त्यानंतर पोलिस दल आणि विविध विभागाचे जवान किती तत्परतेने येतात आणि कारवाई करतात, हे पाहिले जाते.
यात अहमदनगरचे पोलिस दल नेहेमीच यशस्वी होते यात शंका नाही. यंदाही पोलिस दलाने अशीच कामगिरी बजावली. याबद्दल हे सर्व पोलिस दल कौतुकास पात्र ठरले.