युपीएससी रिझल्ट ! नेहा भोसले महाराष्ट्रात पहिली

मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मंगळवारी सकाळी हा जाहीर झाला असून याद्वारे एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. प्रदीप सिंह हा देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रात नेहा भोसले हिने पहिला क्रमांक पटकावला आहे.


नेहा देशात पंधरावी आली आहे. सप्टेंबर, २०१९ मध्ये युपीएससीच्या वतीने लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, २०२० मध्ये मुलाखत घेण्यात आली होती. त्याच आधारावर आयोगाकडून आता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात ५० हून अधिक जणांनी या परिक्षेत यश संपादन केले आहे. त्यात नेहा अव्वल आहे.

यूपीएससीत यश इतर विद्यार्थी 

नेहा भोसले, मंदार पत्की, आशुतोष कुलकर्णी, योगेश पाटील, विशाल नरवडे, राहुल चव्हाण, नेहा देसाई, कुलदीप जंगम, जयंत मंकाळे, अभयसिंह देशमुख, सागर मिसाळ, माधव गित्ते, कुणाल चव्हाण, सचिन हिरेमठ, सुमित महाजन, अविनाश शिंदे, शंकर गिरी, श्रीकांत खांडेकर, योगेश कापसे, गौरी पुजारी, प्रसाद शिंदे, आदित्य काकडे, निमीश पाटील, मयांक स्वामी, महेश गिते, कांतीलाल पाटील, स्वप्नील पवार, ऋषिकेश देसाई, नवनाथ माने, प्रफुल्ल देसाई, विजयसिंहराव गिते, समीर खोडे, सुरेश शिंदे, अभिनव इंगवले, प्रियंका कांबळे, निखील खरे, सौरभ व्हाटकर, अक्षय भोसले, अभिजीत सरकाते, प्रज्ञा खंदारे, संकेत धनवे, शशांक माने, निखील कांबळे, राहूल राठोड, सुमीत रामटेके, निलेश गायकवाड, कुणाल सरोटे, अभय सोनकर, वैभव वाघमारे, सुनील शिंदे, हेमंत नंदनवार, स्वरूप दीक्षित.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !