नवी दिल्ली - आपल्या फुटबॉल कौशल्याने संपूर्ण जगावर मोहिनी घालणारे अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. बुधवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मॅरेडोना यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता.
मागच्या वेळी झटका आला तेव्हा त्यावेळी मॅरेडोना यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण बुधवारी पुन्हा एकदा मॅरेडोना यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. मॅरेडोना यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू म्हणून ओळखले जात होते. अर्जेंटीनाला १९८६ साली फुटबॉल विश्वचषक जिंकवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
मॅरेडोना हे मैदानाबाहेर काही गोष्टींमुळे प्रकाशझोतात आले होते. फुटबॉल खेळत असताना त्यांना चाहत्यांनी देवत्व बहाल केले होते. पण 'आपण फुटबॉलचे देव नसून एक सामान्य फुटबॉलपटू आहोत', असे अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांनी भारतात कोलकाता शहरामध्ये आल्यावर म्हणाले होते.