पुस्तकांचा प्रतिकात्मक केक कापून,
शॉर्ट फिल्मद्वारे व्यक्त केला स्नेह
नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० वा वाढदिवस नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनने आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. एक शॉर्ट फिल्म तयार करून तसेच ८० पुस्तकांचा अनोखा केक कापण्यात आला.
जिल्हा खो खो असोसिएशन व शरद पवार यांचा एक विशेष ऋणानुबंध आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तीन मिनिटांची एक शॉर्ट फिल्म नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन ने तयार केली आहे. तसेच वाढदिवसानिमित्त 80 पुस्तकांचा प्रतिकात्मक केक बनविण्यात आला.
हा केक निवृत्त जिल्हाधिकारी बी. जी. वाघ व नाशिक महानगर पालिकेच्या पश्चिम प्रभाग सभापती वैशाली भोसले यांच्या हस्ते पुस्तकांचा अभिनव केक कापण्यात आला. केकचे छोटे तुकडे भेट म्हणुन कार्यक्रमाला उपस्थित राहणार्या सर्वाना देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले व विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिटय़ूटचे विनायक रानडे, नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन चे ट्रस्टी प्रकाश भाई तांबट, मुख्य सूत्रधार मंदार देशमुख व जुने खेळाडू उपस्थित होते.
या प्रसंगी शालेय वयामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रबोधिनी तील खेळाडूंसाठी विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च इन्स्टिटय़ूट तर्फे १०० पुस्तकांची ग्रंथ पेटी देण्यात आली. याचा उपयोग खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे.