नवी दिल्ली - आता देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. दि. 1 जानेवारी 2021 पासून देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग असणं बंधनकारक असणार आहे.
फास्टटॅगच्या या सक्तीमुळे वाहनांना रोख टोल भरावा लागणार नसल्याचे गडकरी यांनी सांगितलं आहे. फास्टटॅग असल्याने आता वाहनांचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही वाचणार असल्याचेही गडकरी म्हणाले. त्यामुळे आता सुट्टी दिवशी फिरायला गेल्यावर टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रागांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.
फास्टटॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा झाल्यावर त्या धारकाला संदेश मिळणार आहे. अकाऊंटला तुम्हाला रिचार्ज करावं लागणार असून एका फास्टटॅगच्या अकाऊंटचा कालावधी पाच वर्षाचा असणार आहे. पाच वर्षानंतर तुम्हाला नवीन फास्टटॅग विकत घ्यावा लागणार आहे.