स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना आदरांजली
मुंबई :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री पवार, राष्ट्रपिता महात्मा गांधींजींनी सत्य, अहिंसेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे ही त्यांची शिकवण होती. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजी ही केवळ व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार आहे. हा विचार अमर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.
देशाच्या स्वातंत्र्यसाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनाही हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केले आहे.