नगरसेविका सौ. सविताताई दहीवाळकर आणि नितीन दहीवाळकर यांनी वॉर्ड क्रमांक 7 चे केले नंदनवन
शेवगाव : शहरात पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला अशी ओरड नागरिकांकडून होत असताना काही वॉर्ड च्या नगरसेवकांनी मात्र मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवीत अक्षरशः विकासकामांची गंगाच वॉर्ड मध्ये फिरवली. यापैकीच एक नगरसेविका सविताताई दहिवाळकर यांनी पती नितीन दहीवाळकर यांच्या मदतीने आपल्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये भव्य, सुसज्ज वृंदावन गार्डन सह भरभरून विकास कामे मार्गी लावून वॉर्डाचे नंदनवन केले. या अफाट कामांच्या जोरावर शहरातील एक 'आयडॉल लोकप्रतिनिधी' असल्याचे दाखवून देत स्वतः सह उत्कृष्ट वॉर्डचे एक 'रोल मॉडेल'च शेवंगावकरांसमोर उभे केलंय.
शेवगाव ला नगरपरिषद झाली आणि वर्षानुवर्षे समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या शेवंगावकरांना विकासाची स्वप्ने पडू लागली. प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात पदरी मात्र निराशाच आल्याने दिवास्वप्नातून जागे झालेल्या शेवंगावकरांना अलीकडे विकासाची स्वप्ने पडणे देखील बंद झालंय. परंतु, या निराशेच्या परिस्थितीतही वॉर्ड क्रमांक 7 मधील दहीवाळकर दाम्पत्याने मात्र विकासाची कास धरत मतदारांचा विश्वास राखण्याची किमया साधली.
वृंदावनातून नंदनवणाकडे
निवडणुकी आधीच ४ महिने देशपांडे गल्लीतील गणपती मंदिर जवळील जागा हेरली होती. निवडून आल्यावर एक वर्ष कागदोपत्री पाठपुरावा करण्यात गेले. त्यानंतर जस जसा शासन निधी आला तस तसा या कामावर लावला. पूर्वी गोखाडी म्हणून प्रसिद्ध जागा, मोठ मोठ्या बाभळीच जंगल, लोक दिवसाही इथे जायला घाबरत असत. अशा अतिशय टाकाऊ अर्ध्या एकर जागेवर भव्य गार्डन उभारायचे दहीवाळकर दाम्पत्याने ठरविले. हा प्रवास मात्र सोपा नव्हता. स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालये देऊनही नागरिक या जागेवर सौचास बसत. त्यांना घरो घरी जाऊन पाया पडून सांगावे लागले. तेव्हा नंतर ते येथे बसने बंद झाले. गार्डन मध्ये येण्या साठी सर्व बाजूने दर्जेदार काँक्रिट रोड, सर्व बाजूने सौरक्षक भिंत, दोन आकर्षक कमानी, जोगिग ट्रॅक आहे. घसर गुंड्या, झोके, पाळणे आदी खेळण्या बसवल्या आहेत. फॉस्टल पाम, आरेगा पाम, कन्हेर, जास्वंद व इतर अनेक फुलझाडे लावली आहेत. तसेच ८ हायमास्क लावलेत. सुरक्षेसाठी गार्डन परिसरामध्ये ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. २ बोर घेतलेत ज्यांना भरपूर पाणी आहे. वाचमन रूम बांधली आहे. महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे.
या कामात स्वतःला तन, मन, धनाने झोकून दिले. वेळ प्रसंगी पदरचे साडेतीन लाख रुपये स्वतः खर्च केले. अनेक मित्रांनी खेळण्या दिल्या. अनेकांनी झाडांसाठी मदत केली. पाच वर्षांच्या परिश्रमातून साधारण ५० लाख रुपये खर्चातून हे 'वृंदावन' गार्डन उभे राहिले.
वॉर्डात बंद गटारी, सर्व ठिकाणी सुसज्ज रस्ते, जुन्या वीज तारा बदलून नव्याने सर्व तारा टाकल्यात. याशिवाय गल्लोगल्ली हायमॅक्स बसवून परिसर प्रकाशमय केलाय.
या वॉर्डात झालेली विकासकामे आणि भव्य उद्यान पाहिल्यास हे नंदनवन शेवगावातच आहे का, असा प्रश्न पडतो. शहरातील नागरिकांनी या उद्यानाचा लाभ घ्यायचा म्हणून एकदा हा वॉर्ड पाहिला पाहिजे. तसेच इतर नगरसेवकांनीही असे उद्यान आपल्या मतदारांसाठी उभारायला हवे. एकूणच 'आयडॉल लोकप्रतिनिधीने उभारलेले हे उत्कृष्ट वॉर्ड रुपी 'रोल मॉडेल' सर्वांनीच पहावे आणि उभारावे असेच आहे.
नागरिकांचे समाधान हेच आमचे सार्थक
नागरिकांनी टाकलेला विश्वास आणि दिलेली साथ या शिदोरीवर मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली. मुले उद्यानातील खेळण्याचा आनंद लुटतात. महिला, जेष्ठ नागरिक सकाळ-संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी येतात. वॉर्डातील या उद्यानात लोक समाधानी होताना पाहून केलेल्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते, अशी प्रतिक्रिया नगरसेविका सौ. सविताताई दहीवाळकर आणि नितीन दहीवाळकर यांनी 'एमबीपी लाईव्ह 24'शी बोलताना दिली.