सावधान ! 'या' कारणामुळे पुन्हा लॉकडाऊन

मुंबई : सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी राज्यात कोविड-१९ रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आल्याने आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी म्हणून शुक्रवारी पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आता लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 



हे  बंधनकारक


- सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक 

- सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक

- साबणाने सतत हात धुणे आवश्यक


नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा लॉकडाऊन

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे तीन प्रकार समोर आले होते. जगभरातील अनेक देशांत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळले होते. राज्यातही नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन कायम असणार आहे. 


मुबंईत लोकल बंदच 

दरम्यान, मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्याबाबत काही संकेत देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास दूरच असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांना लोकल सेवा खुली करावी अशी मागणी होत असताना कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !