गुड न्यूज : सरकारच्या 'जेम पोर्टल'वर व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी

 नवी दिल्ली :  सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील खरेदीसाठी तयार केलेल्या 'गव्हर्नमेंट इ-मार्केटप्लेस' (जीईम) पोर्टलवर नोंदणी करून आपण पैसे कमवू शकतो. व्यवसाय करणाऱयांसाठी हि सुविधा उप्लबक करून देण्यात आली आहे. 


दरम्यान, सरकारचे ई-मार्केटप्लेस ‘जेम पोर्टल’ ऑगस्ट 2016 मध्ये सुरू करण्यात आले होते. सर्व केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि विभागांना वस्तू आणि सेवांची ऑनलाईन खरेदी सुलभ करण्यासाठी हे पोर्टल सुरू केले गेले. केंद्र सरकारने 15,135 कोटींची खरेदी केलीय. संरक्षण मंत्रालय, रेल्वे आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसइ) ने जीएमकडून सर्वाधिक खरेदी केली. 

15 जानेवारी 2021 पर्यंत  सीपीएसइ ची एकूण खरेदी 4,737 कोटी रुपयांवर पोहोचली. त्याचप्रमाणे 15 जानेवारी 2021 पर्यंत संरक्षण मंत्रालयाची एकूण खरेदी 8,232.6 कोटी रुपये होती. ही सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारमधील सर्वोच्च खरेदी आहे. संरक्षण मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधणे आणि व्यासपीठावर नवीन यंत्रणा जोडल्यामुळे या आर्थिक वर्षात चांगले परिणाम पाहायला मिळाले. 15 जानेवारीपर्यंत जेम पोर्टलमार्फत रेल्वेची खरेदी 2,165.9 कोटी रुपये होती.


10.62 लाखांहून अधिक विक्रेत्यांची नोंदणी

सरकारी विभाग / मंत्रालयांच्या खरेदीसाठी एक खुली आणि पारदर्शक प्रणाली निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या प्लॅटफॉर्मवर सध्या 1,062,344 लाखांहून अधिक विक्रेते नोंदणीकृत आहेत. त्यावर 2,219,724 उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


व्यवसाय कोण करू शकेल?

योग्य आणि प्रमाणित उत्पादने तयार आणि विक्री करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यास गेम वर नोंदणी करून व्यवसाय करण्याचा मार्ग खुला आहे. उदाहरणार्थ, आपण संगणक विकत असल्यास जीईम वर जा आणि नोंदणी करा. यानंतर जर भारत सरकारचा एखादा विभाग संगणक विकत घेण्यासाठी निविदा काढत असेल तर आपल्याला त्याबद्दल माहिती देण्यात येईल आणि आपण या निविदासाठी बोली लावू शकता.



अशी करा नोंदणी

- जीईएम वर नोंदणी करण्यासाठी, https://mkp.gem.gov.in/regifications/signup#!/seller वर जा आणि एक वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.


- यूजर आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला आधार/पॅन, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लागेल.


- यूजर आयडी तयार केल्यानंतर जीईएमवर लॉगिन करा.


-आपल्या प्रोफाईलवर कार्यालयाचा पत्ता, बँक खाते, अनुभव इत्यादीचा तपशील येथे प्रविष्ट करा.


- आपल्या डॅशबोर्ड, आपण विक्री करू इच्छित उत्पादने आणि सेवांच्या कॅटलॉग पर्यायामध्ये उत्पादन किंवा सेवा निवडा.


- आपण स्वत: जीईएमवर नोंदणी करू शकता आणि ते पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी तुम्ही कोणालाही पैसे देत नाही.


- नोंदणी करण्यासाठी आपण https://gem.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इतर अटींविषयी माहिती मिळवू शकता.


ही कागदपत्रे आवश्यक

जीईएम वर नोंदणीसाठी अर्जदाराकडे पॅनकार्ड, उद्योग आधार किंवा एमसीए 21 नोंदणी, व्हॅट / टीआयएन क्रमांक, बँक खाते आणि केवायसी कागदपत्रे जसे ओळखपत्र, गृहनिर्माण पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !