अहमदनगर: नगर-पुणे रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी भूसंपादनासह इतर काही तांत्रीक अडचणी येत असल्यामुळे आता रुंदीकरणाऐवजी हा महामार्गच थेट तिन मजली करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
देशातील विकसित शहरांपैकी एक असणारे पुणे शहर नगरपासून जवळ आहे. पुण्याला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग असून अवघ्या १२० किमी अंतराचा हा महामार्ग आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, वाहतूक कोंडी, व्यावसायिकांची रस्त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे वाहनचालक व पायी जाणारे यांच्या दोघांनाही जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.
देशातील पहिलाच बहुमजली महामार्ग
या कामासाठी सुमारे ६ हजार कोटी रूपयांचा खर्च येणार असून सहा महिन्यात या प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचे नाग़डकरी म्हणाले. तसेच अशा स्वरूपाचा हा देशातील पहिलाच बहुमजली महामार्ग ठरेल असेही ते म्हणाले.