'नेटफ्लिक्स'चा रिचार्ज केला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी फरार असलेला अभिनेता दीप सिंधू याने केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आपला बंद असलेला नंबर दिलीप सिंधूने सुरू केला आणि त्यावरून नेटफ्लिक्सचा 799 रुपये रिचार्ज करण्याची चूक केली. हात क्ल्यू पोलिसांना मिळाला. यानंतर त्याला ट्रॅक केले जाऊ लागले. स्पेशल सेलच्या अनेक टीम त्याच्या मागावर धाडण्यात आल्या, मोठी शोध मोहीम राबवून अखेर करनाल मध्ये पोलिसांनी दीप सिंधू ला ताब्यात घेतले.


दरम्यान, दिल्लीतील हिंसाचार झाल्यानंतर सिंधू फरार झाला होता. पोलीस त्याला पकडण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र त्याचा काही केल्या पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी दीप सिंधूवर एक लाखाचे इनाम घोषित केले होते. दीपक चा मोबाईल नंबर ट्रॅक करण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. मात्र त्याने मोबाईल बंद करून ठेवल्याने त्याला पकडणे आणखी अवघड होऊन बसले होते.

प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. या वेळी पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्‍चक्री उडाली.

या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. मोर्चावेळी आंदोलकांनी घातलेल्या हैदोस प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना जबाबदार धरले आहे. आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी राकेश टिकैत, सरवनसिंग पंढरे, योगेंद्र यादव यांच्यासह 37 शेतकरी नेत्यांवर देखील विविध प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !