कोरोनाची साखळी तुटेना | सोमवारची 'ही' आकडेवारीही चिंताजनक

अहमदनगर - प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असले तरी जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती साखळी काही केल्या तुटायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी देखील चिंता वाढवतील इतके बाधित रुग्ण आढळले आहेत.


सोमवारी जिल्ह्यात ६९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ०५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९२.३१ टक्के इतके झाले आहे. 

सोमवारी जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १ हजार ३४७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ८९४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७५३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४५४ आणि अँटीजेन चाचणीत १४० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८६, अकोले १६, जामखेड ४०, कोपरगाव ३८, नगर ग्रामीण ४१, नेवासा ३, पारनेर १५, पाथर्डी ५४, राहता ४४, राहुरी २६, संगमनेर ३०, शेवगाव ६२, श्रीगोंदा ५२, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट बोर्ड १९, मिलिटरी ३ इतर जिल्हा ४ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५८, अकोले ४, जामखेड २, कर्जत ४, कोपरगाव ६२, नगर ग्रामीण २६, नेवासा ६, पारनेर ७, पाथर्डी २, राहाता ६६, राहुरी १८, संगमनेर ३६, शेवगाव ३, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट ७ आणि इतर जिल्हा ११ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत सोमवारी १४० जण बाधित आढळुन आले. मनपा ९, अकोले १, जामखेड १८, कर्जत ३, कोपरगाव २, नगर ग्रामीण १, नेवासा ०९, पारनेर ४, पाथर्डी ३६, राहाता ६, राहुरी ५, संगमनेर २४, शेवगाव १, श्रीगोंदा ०३ आणि  श्रीरामपूर १८ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, सोमवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २२०, अकोले २८, जामखेड ०६, कर्जत १८,  कोपरगाव २८, नगर ग्रामीण ४७, नेवासा ४८, पारनेर १६, पाथर्डी ३५, राहाता ७४, राहुरी १४, संगमनेर ६६, शेवगाव १०, श्रीगोंदा ६,  श्रीरामपूर ५५, कॅन्टोन्मेंट ११ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या - ८५,०५३
उपचार सुरू असलेले रूग्ण - ५,८९४
एकूण मृत्यू - १,१९५
एकूण रूग्ण संख्या - ९२,१४२
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !