नाशिक कोरोना अपडेट्स : लहान मुलांसाठी केलीय 'ही' व्यवस्था

नाशिक - महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

लहान मुलांसाठी 100 बेडचे हॉस्पिटल

– कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक मनपा प्रशासन अलर्ट
– इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या हॉस्पिटलमध्ये ही लहान मुलांसाठी 100 बेडचे हॉस्पिटल उभारण्याचा विचार
– या अगोदर महापौर सतीश कुलकर्णी यांनी बिटको रुग्णलयात 100 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे दिलेत आदेश
– तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं मत तज्ज्ञांनी स्पष्ट केल्यामुळे प्रशासन कडून तयारीला वेग

सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 2 हजारच्या आत

– सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या 2 हजारच्या आत
– नाशिककरांना काहीसा दिलासा
– गेल्या 24 तासात 1851 रुग्ण पॉझिटिव्ह तर 30 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू
– तर 3 हजार 182 रुग्णांनी कोरोनावर केली मात
– आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 4 हजार 70 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला


1 लाखांहून अधिकचा दंड वसूल

– नाशिक शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर मनपा कडून कारवाईचा बडगा
– गेल्या 24 तासात 170 नागरिकांवर दंडात्मक कारवाई
– तब्बल 1 लाख 29 हजार 500 रुपयांचा दंड केला वसूल
– कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता,शहर लॉकडाउन असतानाही अनेक नागरिक बेजबाबदारपणे रस्त्यावर
– अशा नागरिकांवर मनपाच्या भरारी पथकाकडून होतीये कारवाई

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !