शेवगाव (MBL LIVE 24) :
आपले जीव धोक्यात घालून काम करणारे नगर परिषद कामगार, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, यांचा कोवीड योध्दा म्हणून उत्कृष्ट कार्य करणार्यांचा पुष्प गुच्छ देवून वंचित बहूजन आघाड़ी तर्फे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाणसर यांच्या मार्गदर्शनात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, तालुका संघटक शेख सलीम जिलानी, शेवगांव नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख भारत चव्हाण, वंचित बहूजन आघाड़ी खरडगाव शाखा अध्यक्ष मधूकर सरसे, शेवगांव नगर परिषद कामगार मुकादम सुरेश चव्हाण, नगर परिषद कामगार संदिप मोहीते, सुनिल बोराळे, राहुल साळवे, रविन्द्र भारस्कर, राजू मगर, सिंधूबाई मगर, आनिता मगर, उपस्थित होते. तसेच डॉ विद्या देविदास सांवत, त्रिमूर्ति पब्लिक स्कूल कोवीड सेंटर मधील सिस्टर, रोहीनी संजय भिसे, अर्चना खाडे, सोनाली सरोदे, अनिता लिंबोरे, स्वाती जायगुडे स्वाती, रोहिनी नजन, वार्डबॉय हृषिकेश तुजारे, फार्मासिस्ट अमोल गर्जे, साहिल शेख साहील आदी उपस्थित होते.
या प्रसंगी प्यारेलाल शेख म्हणाले, की आपले जीव धोक्यात घालून काम करणारे कोवीड सेन्टर मध्ये काम करणारे नगर परिषद कामगार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर,परिचारीका, हेच खरे कोविड योध्दा आहेत. आज आपल्या देशात कोरोना संकट काळात 'मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर', म्हणजे काम करतात ईतर व्यक्ती व श्रेय लाटण्याचे कार्य करतात कोणीतरी ईतर भामटे. याच कारणाने सर्व समाजातील तरूणांनी सावध रहावे तसेच शेवगांव शहर व तालुक्यातील सर्व कोविड सेंटर मध्ये काम करणार्या डॉक्टर, नर्स फार्मासिस्ट, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोविड योध्दा म्हणून शेवगांव तालुका वंचित बहूजन आघाड़ी तर्फे प्रमाण-पत्र देवून किसन चव्हाण सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.