उपचारात हलगर्जीपणा : अखेर 'त्या' डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर (MBP LIVE 24 टीम) :

उपचारात हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अहमदनगर मधील डॉक्टर विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे. या प्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद नोंदविल्यानंतर भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील सक्कर चौकात असणारे भोसले हॉस्पिटलमधील डॉक्टर रवींद्र भोसले यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार गणेश भगवान नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे.

भोसले हॉस्पिटलमध्ये योगेश सुरेश भोसले (रा.वाकोडी) हे उपचारासाठी 18 डिसेंबर 2018 रोजी दाखल झाले होते. 18 ते 20 डिसेंबर 2018 दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. भिंगार पोलीस ठाण्यात त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

उपचारात हलगर्जीपणा

मृत योगेश भोसले यांच्या नातेवाईकांनी सिव्हिल सर्जनकडे तक्रार केली होती. सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश सायगावकर यांनी चौकशी करून योगेश भोसलेचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच झाल्याचा निष्कर्ष काढला. तसा अहवाल भिंगार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर एक जून 2021 रोजी डॉक्टर रवींद्र भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !