खडे बोल : तर लोकं जोड्याने हाणतील : उद्धव ठाकरे

मुंबई (MBP LIVE 24) : 

कोरोना संकटकाळात रोजी-रोटीच्या प्रश्नाने चिंताग्रस्त नागरिक स्वबळाचा नारा दिल्यास जोडे हाणतील, अशा परखड शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व भाजपला खडे बोल सुनावले. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच भाजप नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेचा समाचार घेताना ठाकरे यांनी प्रामुख्याने मित्रपक्ष कांग्रेसला अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या आहेत. ते म्हणाले, 'अनेकांचा आज रोजगार गेला आहे. माझे काय होणार ही चिंता आहे. आता निवडणुकाही नाहीत. अशावेळी कोणी स्वबळाचा नारा देणार असेल तर लोक जोडे हाणतील. ते म्हणतील, माझ्या रोजीरोटीचे काय ते सांग. तू स्वबळ सांगणार आणि आम्हाला भिकेला लावणार. कोरोनातही राजकारण होत असेल तर देश अस्वस्थतेकडे जाईल,' असा चिमटाही त्यांनी काढला.

ठाकरे म्हणाले, 'सत्तेसाठी लाचार होऊन शिवसेना कोणाची पालखी वाहणार नाही. शिवसेनेचा जन्म लोकांच्या न्याय हक्कांसाठी झाला आहे. विकृत राजकारण करीत राहिलो तर आपले आणि देशाचे काही खरे नाही.

कोरोना संकट काळातही राजकारण करणे हे विकृतीकरण आहे, अशा कानपिचक्या त्यांनी भाजपला दिल्या.

आमचे स्वबळ लोकांच्या हक्कांसाठीशिवसेनाप्रमुखांनीच आम्हाला स्वबळ, आत्मबळ दिले आहे. आम्हीही स्वबळावर लढू पण आमचा स्वबळाचा अर्थ केवळ निवडणूक अन् सत्ताप्राप्ती हा नाही. तर लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी तलवार उचलण्याची ताकद हे आमचे स्वबळ आहे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !