राष्ट्रवादी शिक्षक संघ गंगापुर तालुका अध्यक्षपदी प्रा. प्रशांत मरकड

औरंगाबाद  - महाराष्ट्र ज्युनिअर महाविदयालय वाळूज येथील प्रा. प्रशांत मरकड यांची राष्ट्रवादी शिक्षक संघ गंगापुर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना औरंगाबाद विभागाचे शिक्षक आ. विक्रम काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले

फोटो ओळ : प्रा . प्रशांत मरकड यांना नियुक्ती पत्र प्रदान करतांना शिक्षक आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप विखे, प्रा. वाहेद शेख,  प्रा. गोविद गोंडे आदी शिक्षक पदाधिकारी.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदिप विखे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. वाहेद शेख, प्रा. आनंद शिदे , प्रा. गोविद गोंडे, प्रा. अशिष राठोड, प्रा. नितीन खंदारे , प्रा. प्रविण ढाकणे , बाळासाहेब पानकर रामेश्वर काकडे आदी संघटनेचे शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.

मरकड यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत शिक्षक राष्ट्रवादी शिक्षक संघ औरंगाबाद कडून  त्यांची निवड जाहिर करण्यात आली. त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध आंदोलनात सहभाग घेत प्रश्न मार्गी लावले. या निवडीबद्ल संघटनेच्या सर्व शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !