नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस रत्नागिरीकडे रवाना, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील वक्तव्य भोवले

नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड यांच्यावर सोपविली जबाबदारी

नाशिक । MBP LIVE 24 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानंतर पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक राणे यांना अटक करण्यासाठी आज सकाळीच रत्नागिरीकडे रवाना झाले आहे.


नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत नारायण राणे यांच्याविरोधात सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे लेखी आदेश काढले आहेत.

राणे यांना अटक होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.

समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकते. त्यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. राणेंच्या विधानाने समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.

नाशिक, पुणे सह अन्य ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना-युवासेना कडून तक्रार दाखल होत असून राणे यांना अटक होणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे याच्यासंदर्भात खालच्या पातळीवर जाऊन टिपणी करून राणे यांनी राजशिष्टाचार पायदळी तुडवले असल्याची टीका नारायण राणेवर होत आहे.

भाजप कार्यालय फोडले

या घटनेमुळे नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शहरातील एन. डी. पटेल रोडवरील भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील शिवसैनिक अधिक आक्रमक झाले असून नेहमीप्रमाणे राणे आणि शिवसेना या वादामुळे महाराष्ट्रातील शांतता बिघाडणार असल्याचे चित्र आहे.


फौजफाटा रवाना - राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून रत्नागिरीला निघालेल्या टीम मध्ये पाच वाहने व 22 पोलीस कर्मचारी व अधिकारी आहेत. यामध्ये पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड, 2 पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 17 पोलिस कर्मचारी असा फौजफाटा आहे. राणे यांना अटक करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेले पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड हे 'डॅशिंग' अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या धडाकेबाज व्यक्तिमत्वामुळेच पोलीस आयुक्त पांडे यांनी बारकुंड यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !