काही नाती रिक्त करतात,
आपण होऊन जातो आधेअधुरे...!
घरं रिक्त होतात
सुरकुतलेले हात,
आठवत राहतात..
जुन्या आठवणींचे पसारे....!
नवी नाती जोडली जातात
पण जुन्यांचा आठव,
फुटत रहातात वेदनांचे धुमारे...!
सल काचत रहातात
हे बंध असतात का पिचणारे...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)