चंद्रघंटेने माथी धारण केलेली ही राखाडी रंगाची चंद्रकोर सतत सांगत असते, मी सर्वांच्या मदतीला तत्पर आहे. हे झालं आपल्या पुराणातील.! पण मला मात्र या करड्या-राखाडी रंगाकडे जरा वेगळ्या नजरेनं पहावस वाटतं.. आयुष्यात फक्त काळं किंवा फक्त पांढरं नसतंच, कधी उच्च, कधी मध्यम, कधी सुक्ष्म असं आयुष्य असतं.
जगात कोणीही अगदी काळेकुट्ट आणि पांढरेशुभ्र व्यक्तिमत्वाचे नसते. आपल्या सर्वांच्याच व्यक्तिमत्त्वांना कमीअधिक प्रमाणात ग्रे शेडस असतातच. खर सांगू का.? संपूर्ण काळ्या किंवा पांढऱ्या व्यक्तिमत्वाचे लोक असूच नयेत. हे असं एकांगी असणं चुकीचचं आहे.
संपूर्ण काळ्या किंवा संपूर्ण पांढऱ्या व्यक्तिमत्त्वांचे लोक असूच नयेत. ते संपूर्ण पांढऱ्या व्यक्तिमत्त्वांचे लोकं इतरांना जगूच देत नाहीत. आणि संपूर्ण काळ्या व्यक्तिमत्वाचे लोकही इतरांना जगू देत नाहीत. म्हणून दोहोंचं मिश्रण असलेला करड्या-राखाडी रंग बरा ना?
तसंही हल्ली कंटेपररी इंटेरिअर मध्ये करड्या-राखाडी रंगाची थीम रॉयल मानली जाते. तसचं काहीसं. खरतरं हा करड्या-राखाडी रंगामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वांत आवश्यक असणारं करारीपण येतं. तसंच सौम्यपणही असतंच. ह्यामुळं ना आपल्या व्यक्तिमत्त्वांला रिचनेस बहाल करत असतं..!
ग्रे, करडा, राखाडी. पांढऱ्या, काळ्या रंगाचा बेमालुम मिलाप. माणूस आपल्या व्यक्तिमत्त्वांत परिस्थिती, वेळ, समोरील व्यक्ती, अनुभव, या साऱ्यांच्या जोरावर आपल्या व्यक्तिमत्त्वांत पांढऱ्या किंवा काळ्या छटेचा अंश वाढवत किंवा कमी करत असतो.
रंग आपल्या आयुष्यात आनंद भरता भरतात, तसे व्यक्तिमत्त्वांमध्ये बदलही घडवत असतात. आता हे बदल कसे करत आपले व्यक्तिमत्व उजळून साऱ्यांचं आवडतं व्हायचं, हे आपल्याच हातात आहे. हे 101% खरं आहे ना.? बघा पटतय का? पटलं घ्या नाहीतर द्या सोडून..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)