तंत्रज्ञान - अनेकदा आपल्या संपर्कातील काही जणांनी आपल्याला व्हॉट्स ॲपवर ब्लॉक केलेले असते. मात्र याचा आपल्याला काहीच सुगावा नसतो. मात्र येथे आता तुम्हाला व्हॉट्सॲपवर कोणी-कोणी ब्लॉक केले आहे., हे कसे तपासायचे, याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.
आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत, ठराविक नंबरवरून येणारे मेसेजेस नको असतील, तर आपण व्हॉट्स अॅपवर त्यांना सहज ब्लाॅक करू शकतो. मात्र, आपण ब्लॉक केलेय, हे समोरच्याला सहसा लक्षात येत नाही. त्याला फक्त त्याचे मेसेजेस डिलीव्हर न झाल्याचे दिसत असते. आता आपण ब्लॉक आहोत की नाही, हे ओळखण्याच्या काही पद्धती येथे दिलेल्या आहेत.
पहिली पद्धत - आपल्याला कोणी ब्लॉक केले हे जाणून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. ज्या कोणी व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केले असेल, तर त्या व्यक्तीचे प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन दिसणे बंद होते. त्यासह त्याने टाकलेले स्टेटस देखील दिसणे बंद होते.
दुसरी पद्धत - जर तुम्हाला कोणी ब्लॉक केले हे जाणून घ्यायचे असेल तर समोरच्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲप चॅटवर जाऊन एसएमएस करायचा. एसएमएस पाठवल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जर सिंगल टिक आली तर, असे समजा की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कंटाळून ब्लॉक केले आहे.
तिसरी पद्धत - जर तुम्हाला कोणी ब्लॉक केले असेल तर, त्या व्यक्तीसोबत आपले व्हॉट्सॲप कॉल होऊ शकणार नाही. त्याही पलीकडे जाऊन तुम्ही व्हॉट्सॲपवर एखादा ग्रुप तयार करून, त्यामध्ये समोरच्या व्यक्तीला त्यात टाकू शकता. जर ग्रुपमध्ये ॲड करून देखील होत नसेल, तर समजा की तुम्हाला ब्लॉक केले आहे.