खुशखबर ! नगरमध्ये लवकरच 'ब्रायडल मेकअप' स्पर्धा

अहमदनगर - सोमवार दि. ६ डिसेंबर रोजी नगरमध्ये ब्रायडल मेकअप स्पर्धा (नववधू मेकअप स्पर्धा) आयोजित करण्यात आली आहे. येथील प्रतिबिंब संस्थेच्या वतीने व अहमदनगर जिल्हा ब्युटीपार्लर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे. ब्युटिशियन व मॉडेलसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

यंदा या स्पर्धाचे हे तिसरे वर्षे आहे. सावेडीतील गुलमोहररोड, पारिजात चौकाजवळील कोहिनूर मंगल कार्यालय येथे दुपारी १ वाजता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या ब्युटिशियनला 'बेस्ट ब्युटिशन ऑफ नगर ब्रायडल' आणि मॉडेलला 'बेस्ट ब्रायडल ऑफ नगर' हा पुरस्कार व भेटवस्तू देण्यात येणार आहे.

ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँके जवळ,दिल्लीगेट, अहमदनगर मोबाईल 9284930674 वर किंवा जयबाबा कॉस्मेटिक, मार्केटयार्ड येथे संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धकांनी कोणत्याही प्रकारची, जातीधर्माची  नववधु बनवता येईल. त्यासाठी मेकअपला १ तासाचा वेळ देण्यात येईल. कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकते. ब्युटिशन आपल्याबरोबर एक असिस्टंट ठेवू शकते. सहभागी ब्युटिशन व मॉडेलला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !