मंद प्रकाश, हळू आवाजात कानी पडणारे रोमँटिक संगीत, कुठल्या गर्दीचा कोलाहल नाही की तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणी नाही. समोर बसलंय तुमचं 'क्रश' आणि दोघांच्या मध्ये कॉफीचे दोन कप. अहाहा, काय मस्त सीन आहे ना.. याचसाठी केला होता अट्टाहास.
'कॉफी' हे गरम आणि आवडते पेय आहे. मनसोक्त बोलणं, ऑफिसचं बोलणं, बिझनेसचं बोलणं, मित्रांसोबत गप्पा मारणं, हे करत असताना चहा-कॉफीची एक वेगळीच मजा असते. 'कॅफे कॉफी डे' ही भारतातील एक प्रसिद्ध व्यवसाय शृंखला आहे, जिथे तुम्हाला विविध प्रकारच्या कॉफी मिळतात.
इसवी सन ६०० मध्ये 'इथिओपिया'च्या काफा प्रांतात 'कॉफी'ची वनस्पती प्रथम सापडली, असं म्हणतात. एक मेंढपाळ जनावरे चरायला घेऊन जात होता. त्यांच्या वागण्यात अचानक चपळता आली, हे त्याला जाणवलं. सर्व प्राणी एका वनस्पतीच्या गडद लाल रंगाच्या बिया खात होते.
त्यामुळे सर्व प्राणी पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि उत्साही दिसत होते. मेंढपाळाने स्वतः काही बिया खाल्ल्या आणि त्यालाही ऊर्जा आणि शक्ती जाणवली. याच त्या कॉफीच्या बिया. मग हळूहळू इतर लोकांनीही त्याचा वापर जेवणात करायला सुरुवात केली. होय लोक जेवणासाठी कॉफीच्या बिया वापरायचे.
तिथे तुम्ही कुणाला तरी भेटू शकता आणि बोलू शकता. कॉफीचं इतकं कौतुक काय लावलंय असं तुम्ही म्हणाल आता. पण मला एक सांगा.. तुमचा कोणताही मित्र, कोणीही सोेबती, सहकारी यांना तुम्ही 'चल रे चहा घेऊ' असंच म्हणता. पण तिला ? हो हो त्या खास व्यक्तीला काय विचारता.? 'कॉफी'च ना?
'चाय' पीने वालों, तुम्हारी खता ही नहीं,
'कॉफ़ी' चीज क्या है, तुम्हें पता ही नहीं..!
कॉफीची बातच अलग आहे. चहा कितीही प्या, चहाचे कितीही दिवाने असा.. पण 'काॅफी' म्हणजे 'काॅफी'च असते. आता त्यातले प्रकार का सांगत बसू यार.. कोणतीही घ्या, पण एकदा तरी अशी काॅफी घ्या. बस्स. ये पल यही थम जाए, अस्संच वाटतं ना ? यही तो खासियत है कॉफी की..