१० हजारांची लाच स्वीकारणे 'तिला' पडले महागात, कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा..

अहमदनगर - दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नगरच्या न्यायालयाने भूमी अभिलेख विभागाच्या महिला उपअधीक्षकाला दोषी ठरवले. ज्योती दत्तात्रय डफळ उर्फ ज्योती संदीप नराल (वय ४३, रा. नगर) असे त्यांचे  नाव आहे. कोर्टाने त्यांना ४ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विशेष न्यायालय न्यायाधीश तसेच प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी मंगळवारी हा निकाल सुनावला आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तीवाद केलाा होता.

काय होते प्रकरण - एका शेतकऱ्याला (रा. खारे कर्जुने) त्यांच्या वाट्याच्या जमिनीची मोजणी करायची होती. तसेच मोजणी करून निशाणी हवी होती. त्यासाठी त्याने भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर अर्ज केलेला होता. परंतु, या कामासाठी उपअधीक्षक ज्योती डफळ यांनी चक्क १० हजार रुपयांची लाच मागितली.

त्या शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ज्योती डफळ यांना रंगेहात लाच स्वीकारताना पकडले. लाचलुचपतचे पीआय शाम पोवरे यांनी तपासानंतर कोर्टात चार्जशीट दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाने ४ साक्षी नोंदवल्या.

न्यायालयाने तोंडी साक्ष, तांत्रिक व कागदी पुरावा, तसेच अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी ज्योती डफळ यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी दोषी ठरवले. अन् त्यांना ४ वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिने साधी कैदेची शिक्षा आहे.

या खटल्याच्या कामकाजासाठी अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांना महिला पोलिस नाईक संध्या म्हस्के व सहायक फौजदार लक्ष्मण काशिद यांचेही सहकार्य लाभले. प्रथमच इतक्या उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षा झाली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !