अहमदनगर - जिल्ह्यात मंगळवारी ५६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार १५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. तर जिल्ह्यात ७१२ नवे रुग्ण सापडले आहेत.
सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ८०८ इतकी झाली आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९४ आणि अँटीजेन चाचणीत ३७४ रुग्ण बाधीत आढळले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये जामखेड ०४, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रा. ०४, नेवासा ०१, पारनेर ११, पाथर्डी ०६, राहुरी ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा १२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०८, जामखेड २६, कर्जत २९, कोपरगाव १३, नगर ग्रा.११, नेवासा ३५, पारनेर ११, पाथर्डी ०४, राहता ०७, राहुरी ११, संगमनेर ६९, शेवगाव ४६, श्रीरामपूर ०८ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३७४ जण बाधित आढळुन आले. मनपा १२, अकोले ३१, जामखेड २६, कर्जत ५७, कोपरगाव ०७, नगर ग्रा. २५, नेवासा २३, पारनेर ६८, पाथर्डी २७, राहता १७, राहुरी १३, संगमनेर १८, शेवगाव २४, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ०४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले १३, जामखेड ८६, कर्जत ४७, कोपरगाव २०, नगर ग्रा. २५, नेवासा २३, पारनेर ७७, पाथर्डी ४७, राहता १५, राहुरी १६, संगमनेर १०७, शेवगाव २९, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर १८ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.