महापालिकेने तत्काळ 'ही' कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी...

अहमदनगर - शहरात खाजगी मालमत्ता धारकांच्या जागेत, एमआयडीसी पासून केडगावपर्यंत तसेच उपनगरात गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड, तपोवन रोड आणि इतर भागात, मनपाच्या आरक्षित आणि न्यायप्रविष्ट जागांवर, मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. याकडे वंचित बहुजन आघाडीने लक्ष्य वेधले आहे.


वंचित बहुजन आघाडीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. अनधिकृत पत्र्याचे शेड आणि गाळेधारक मनपाचा कर बुडवत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शहरात काही ठिकाणी महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता पक्के बांधकाम केले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, गुलमोहर रोड, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, तपोवन रोड, एमआयडीसी, तसेच केडगावमध्ये अशा प्रकारचे अनधिकृत पत्र्याचे गाळे काढले आहेत. या अनधिकृत गाळ्यांना कोणाचे अभय आहे..?

मनपाचा अतिक्रमण विभाग फक्त नोटिसा बजावून मोकळा होतो. ही सर्वसामान्य नगरकरांची दिशाभूल आहे की वास्तव आहे, याबाबत नगरकर संभ्रमात आहे. कारवाई करण्याचा देखावा करीत आहे का, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. संबंधित सर्व अधिकारी यांची प्रशासकीय स्तरावर आणि मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली.

शहराच्या विकासाची वाट मोकळी करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी अहमदनगर औरंगाबाद रोडवर महानगरपालिकेसमोर रास्ता रोको केला जाईल. पालिकेच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. शहरातील व्यावसायिक व्यापाऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा संघटक फिरोज पठाण, जीवन पारधे, संजय जगताप, सचिन पाटील, प्रवीण ओरे, विशाल साबळे, भाऊ साळवे, अमर निरभणे, विद्या जाधव, बेबी निरभवणे, श्रुती सरोदे, धनश्री शेंडगे, ज्योती घोडके, जयश्री काते, प्रमोद आढाव, आत्माराम डागवाले, नयन अल्लाट, मुमताज शेख, रेश्मा शेख, सायली चांदेकर, स्वप्नाली चांदेकर, आदी उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !