अहमदनगर - जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल ७९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रूग्णांची वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार १२१ इतकी झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून नगर जिल्ह्यात कोरूना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी नगर महापालिका हद्दीत तब्बल २०० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर राहाता तालुक्यात १३४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग लागलेला अतिदक्षता विभाग पूर्ववत सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच प्रशासनाने खडक निर्बंध जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे.
शुक्रवारी बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा २००, अकोले ५२, जामखेड २३, कोपरगाव ५२, नगर ग्रामिण ४७, नेवासा २३, पारनेर ४७, पाथर्डी २७, राहाता १३४, राहुरी ७, संगमनेर ३०, शेवगाव ३२, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ३०, कॅन्टो्नमेंट बोर्ड ३, मिलिटरी हॉस्पिटल ३७, इतर जिल्हा २७ आणि इतर राज्य ३, अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. घराबाहेर पडताना मास्क सक्तीने वापरावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - ३,५२,३२७
उपचार सुरू असलेले रूग्ण - ३,१२१
पोर्टलवरील मृत्यू नोंद - ७,१५७
एकूण रूग्ण संख्या - ३,६२,६०५
उपचार सुरू असलेले रूग्ण - ३,१२१
पोर्टलवरील मृत्यू नोंद - ७,१५७
एकूण रूग्ण संख्या - ३,६२,६०५