मागील दोन वर्षात स्वताला झाकून घेतलं होत ना आपण...?
इतकं की अगदी डोळे बुजून जावेत..
प्रेमाची, नात्याची, जिवलग, ओळखीची.. असे कितीतरी..
अलगद सोडून गेले आपल्याला या दिवसांत....
फळ्यावर लिहिलेलं वहीमधे सगळं उतरवुन घेण्यापूर्वीच
इतकं की अगदी डोळे बुजून जावेत..
प्रेमाची, नात्याची, जिवलग, ओळखीची.. असे कितीतरी..
अलगद सोडून गेले आपल्याला या दिवसांत....
फळ्यावर लिहिलेलं वहीमधे सगळं उतरवुन घेण्यापूर्वीच
त्यावर डस्टर फिरवला जावा तसे..
सवय होऊन जावी..
कानांची, डोळ्यांची..
रोज कोणी गेल्याची आपल्या जगातून...!
सारं काही शुष्क व्हावं..
अश्रूंनी भरलेला चेहरा तसाच सुकून जावा..
कानांची, डोळ्यांची..
रोज कोणी गेल्याची आपल्या जगातून...!
सारं काही शुष्क व्हावं..
अश्रूंनी भरलेला चेहरा तसाच सुकून जावा..
जगणं आणि मरण..
किती तत्वज्ञान झालं असेलआपलं या दोन वाक्यांभोवती...!
हे सारं पाहताना.. अनुभवतांना..
श्वास थांबला की सारं काही थांबल..
जितकं जगायचं, आनंद वाटू या..
पैश्याचा हव्यास हवा तरी कशाला?
उद्याचा भरवसा नाही..
माणुसकी मोलाची...
माणूस महत्वाचा..
जात, पात हे भेद करण्यात अर्थ नाही..
डोळे उघडल्या सारखे हे सगळ आपणं बोलत होतो.
माणुसकी मोलाची...
माणूस महत्वाचा..
जात, पात हे भेद करण्यात अर्थ नाही..
डोळे उघडल्या सारखे हे सगळ आपणं बोलत होतो.
रस्त्यावरचा सन्नाटा पाहिला...
घरातल्या खिडकीच्या कोपऱ्यात बसूनकितीतरी वेळ आकाशाकडे शून्यात बघत होतो आपण...
आत्ता आत्ता कुठे,
थोडी गजबज सूरू झाली..
घरांची दारे उघडली..
दुकानासमोर सडा पडू लागला..
हरवलेली माणसं बोलू लागली..
फिरु लागली..
आकाश पुन्हा नवं भासू लागलं...
पण,
आपल्या विचारांची सर्व्हिसिंग तेवढी करायची राहून गेल्यासारखं वाटू लागलं..
मागील दिवस एकांतात, चिंतन करण्यात गेले...!
पण,
आपली जात काही मनातून गेली नाही.
पण,
आपल्या विचारांची सर्व्हिसिंग तेवढी करायची राहून गेल्यासारखं वाटू लागलं..
मागील दिवस एकांतात, चिंतन करण्यात गेले...!
पण,
आपली जात काही मनातून गेली नाही.
परमेश्र्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत..
एकाच ठिकाणी विसाव्याचे..
तरीही,
जात जातीशी भिडू लागली..
रंगात अडकू लागली...
अभिमान, गर्व सोडून खुन्नस घेऊन मोकळी फिरू लागली..
घरातलं कोणी गेलं तेव्हा उचलायला खांदा नव्हता..
डोळे पुसायला नसायचं कोणी..
आपलीच माणसं परकी झाली....
तेव्हा,
फैजपूरचे वयोवृद्ध शरीफ चाचा..
शेकडो बेवारस मृतदेहांवर फुले वाहुन त्यांच्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करीत अग्निसंस्कार करीत होते....!
माणुसकी हरवलेल्या गर्दीत मानवतेचा हा चेहरा माणसातल्या संवेदनांच एक सुंदर उदाहरण म्हणावं....
सगळे रंग एकमेकात मिसळून त्याचं छान इंद्रधनु व्हावं..
जगण्याचे संदर्भ हरवलेल्या जगात मानवतेचं नवं नातं खुलावं...!

- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)