अनिरुद्ध तिडके (अहमनगर) - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचे’ राज्यस्तरीय उद्घाटन सोमवारी झाले. राज्यात एकूण १९ केंद्रावर जवळपास तीन महिने अविरत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धांमधून राज्यात एकूण ९५० संघ (संस्था) सहभागी होत आहेत. नगर केंद्रावर अकरा नाटकांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
नगरमध्ये तब्बल तीन वर्षांनंतर उघडणार हौशी राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडणार आहे. कोरोना विषाणूने थैमान घातल्याने गेले दोन वर्षे बंद असलेले थिएटर्स आणि नाट्यगृहे आता खुली झाली आहेत. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर नगरच्या नाट्यगृहांचे पडदे उघडणार आहेत.
सोमवारपासून नाट्यरसिकांना मेजवानी देणारी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा माऊली सभागृहात सुरू झाली आहे. दररोज रात्री ७ वाजता पडदा उघडेल. सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी हाऊसफुल्ल प्रतिष्ठानतर्फे निर्मित व रविंद्र व्यवहारे दिग्दर्शित ‘एटीएस’ हे नाटक सादर झाले.
दि. २२ फेब्रुवारीला कलासाई नाट्यसंस्था निर्मित व शैलेश शिंदे दिग्दर्शित ‘पूर्णविराम’ हे नाटक सादर होईल. दि. २३ फेब्रुवारीला रंगकर्मी प्रतिष्ठानचे शैलेश देशमुख दिग्दर्शित ‘महापात्रा’ नाटक सादर होईल. दि. २४ फेब्रुवारीला रयत शिक्षण संस्थेचे रंगकर्मी वर्षा भवार व केतन एडके दिग्दर्शित ‘एक्स्पायरी डेट’ नाटक सादर करतील.
दि. २५ फेब्रुवारीला साईप्रित प्रतिष्ठानतर्फे संजय लोळगे दिग्दर्शित ‘तुक्याची आवली’ हे नाटक सादर होईल. दि. २६ फेब्रुवारीला घोडेगाव येथील समर्थ युवा प्रतिष्ठानतर्फे दिग्दर्शक संदीप येळवंडे यांचे ‘सलवा जुडूम’ हे नाटक सादर होणार आहे. दि. १ मार्च रोजी संकल्पना फाऊंडेशन निर्मित व डॉ. किरण लद्दे दिग्दर्शित ‘षडयंत्र’ नाटक सादर होईल.
दि. २ मार्चला सप्तरंग थिएटर्सचे ‘नागपद्म’ नाटक सादर होईल. दि. ३ मार्चला सार्थक बहुद्देशीय संस्थेचे संदीप कदम दिग्दर्शित ‘पुरूषार्थ’ नाटक सादर होईल. दि. ४ मार्चला वात्सल्य प्रतिष्ठानचे सतीश लोटके दिग्दर्शित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे नाटक सादर केले जाईल. तर ५ मार्चला विश्वकर्मा क्रीडा युवक मंडळाचे अमित खताळ दिग्दर्शित ‘कोणी तरी येणार गं’ हे नाटक सादर होईल.
या सर्व नाटकांचे समीक्षण आपल्याला MBP Live24 या पोर्टलवर सर्वात आधी वाचायला मिळेल. त्यामुळे आमचे फेसबुक पेज लाईक करा. आम्हाला ट्विटरवर फॉलो करा.