अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालयात वकील संघाची स्थापना, अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे

अहमदनगर - जिल्हा कौटुंबिक न्यायालयात नुकतीच वकील संघाची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे यांची, उपाध्यक्षपदी अ‍ॅड. लक्ष्मण कचरे, कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. सुरेश लगड, तर सचिवपदी अ‍ॅड. अनिता दिघे यांची नियुक्ती झाली आहे. 

'फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगर'ची स्थापना करण्यात आली आहे. स्थलांतर होऊन जुन्या जिल्हा न्यायालयात सुरु झालेल्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांच्या हस्ते 'फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन'च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. सहसचिवपदी अ‍ॅड. अर्चना शेलोत, खजिनदारपदी अ‍ॅड. राजेश कावरे, सदस्यपदी अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड. मच्छिंद्र आंबेकर, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. शिवाजी सांगळे, अ‍ॅड. सुचिता बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी न्यायाधीश नेत्रा कंक म्हणाल्या, फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनमुळे कौटुंबिक न्यायदानाच्या प्रक्रियेत मदत होणार आहे. वकिल, पक्षकार यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बार असोसिएशनची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

वकिली व्यवसायात प्रत्येकाला ताण-तणावाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाने आनंदी जीवन जगण्यासाठी विचारावर नियंत्रण ठेऊन तणावमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले.

नूतन अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी (आण्णा) कराळे यांनी वकीलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असून, सर्व वकील बांधवांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी अहमदनगर शहर वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. वांढेकर, अ‍ॅड. निर्मला चौधरी, अ‍ॅड. सेलोत, अ‍ॅड. उजागरे, अ‍ॅड. राशीनकर आदींसह पक्षकार उपस्थित होते.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !